आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नापिकी, कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून सेलूत पिता-पुत्राने घेतले विष; वडिलांचे निधन, मुलगा वाचला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलू- तालुक्यातील चिकलठाणा खु. येथील एका शेतकऱ्यासह १३ वर्षांच्या मुलाने नापिकीस कंटाळून विष प्राशन केले. यामध्ये वडिलाचे निधन झाले, तर १३ वर्षांचा मुलगा उपचारानंतर बचावला आहे. ही घटना ८ जुलै रोजी दुपारी १ ते ५ च्या दरम्यान घडली. मृत राजेभाऊ लोखंडे यांच्यावर सोमवार ८ जुलै रोजी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. 


तालुक्यातील चिकलठाणा खु. येथील शेतकरी राजेभाऊ नामदेव लोखंडे (३६) यांची चिकलठाणा खु. येथे तीन एकर शेती आहे. सततच्या नापिकीमुळे तसेच सेलूच्या भारतीय स्टेट बँक व मोरेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे थकीत कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असतानाच राजेभाऊ नामदेव लोखंडे यांनी राहत्या घरी विष प्राशन केले. वडिलांनी विष घेतल्यामुळे १३ वर्षांचा मुलगा अतुल राजाभाऊ लोखंडे यानेही विष प्राशन केले. या दोघा पिता-पुत्राला तत्काळ सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वडील राजाभाऊ लोखंडे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. मुलगा अतुल राजाभाऊ लोखंडे वर रात्रभराच्या उपचारानंतर सोमवारी प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे सुटी दिली. 

बातम्या आणखी आहेत...