आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​आष्टी तालुक्यात गारपिटीने शेतकरी जखमी; पीकांचेही नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी- आष्‍टी तालूक्‍यात शनिवारी दुपारी चार वाजता झालेल्‍या गारपीटीने शेतकरी जखमी झाले आहे. तालुक्यातील क-हेवाडी, भाळवणी, मातकुळी, करंजी, ब्रम्हगांव परिसरात दुपारी चारच्या दरम्यान वादळ वा-यासह विजेच्या कडकडाटांसह पाऊस झाला. अवकाळी पावसाने शेतकरी भिमराव मुकिंदा आनपट ( वय ७० वर्षे ) हे गंभीर जखमी झाले असून पीकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानाचे  पंचनामे करण्याचे आदेश मंडळधिकारी व तलाठी यांना  देण्यात आले असल्याचे  तहसिलदार  रामेश्वर गोरे यांनी सांगीतले आहे. शनिवारी सकाळ पासुन  आष्टी शहरासह तालुक्यातील विज पुरवठा खंडीत होता व अचानक आलेल्या वादळी पावसामुळे  रात्री उशिरा पर्यंत विज पुरवठा खंडीत राहिल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. माजलगाव तालुक्यातील टाकरवण परीसरातही शनिवारी सायंकाळी सात वाजता  वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कापुस, गहु ,हरबऱ्याचे नुकसान झाले असुन कैऱ्या गळुन पडल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...