आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​बारा फूट उंच स्टँडवर चार मिनिटे शीर्षासन! गिनीज बुकात नाव नोंदवण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- बारा फूट उंच लोखंडी स्टँडवर चार मिनिटे शीर्षासन करत गिनीज बुकात नाव नोंदवण्याचा प्रयत्न जालना येथील युवक निवृत्ती डिघे याने गुरुवारी केला.

 

जालना शहरात जागतिक योग दिनाच्या निमित्ताने त्याने प्रयत्न केला असून यासाठी त्याने दीड वर्षांपासून सराव सुरू केला होता. तो सहा वर्षांपासूनच अशा शीर्षासनाचा सराव करीत होता. मात्र मागील दीड वर्षापासून त्याने यात सातत्य आणले. तामिळनाडू येथील ड्रायगन जेटली याने स्टँडवर २ मिनिटे ३० सेकंद शीर्षासन केले होते, असा दावाही डिघे याने केला आहे. वर्ल्ड रेकॉर्डसाठीही त्याने हे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे.  

बातम्या आणखी आहेत...