आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाड्यासाठी 4 धरणे बांधणार: गडकरी, पश्चिम महाराष्ट्राने पाणी पळवले: फडणवीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - दमण गंगा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याला देण्यासाठी ४ धरणे बांधण्याचा प्रस्ताव पाठवण्यास मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले आहे. या प्रकल्पाच्या खर्चाचा निधी केंद्र सरकार देईल यामुळे मराठवाडा सुजलाम सुफ‌्लाम हाेईल अशी अाशा केंद्रीय भूप्रृष्ठ, रस्ते वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी नांदेड येथे व्यक्त केली. 


गडकरी म्हणाले, या  प्रकल्पांतर्गत ठाणे जिल्ह्याच्या वरच्या भागात चार धरणे बांधता येतील आणि त्यातून नदीजोड प्रकल्प राबवून हे पाणी मराठवाडा आणि नाशिकच्या धरणांमध्ये साठवण्यात येईल. या प्रकल्पाचे काम तीन महिन्यात सुरु होणार आहे. यासाठी  निधीची   चणचण भासू देणार नसल्याची ग्वाहीही गडकरी यांनी दिली.  फडणवीसांनी आमचे एक महत्वाचे काम केले. ठाणे जिल्ह्यातील पिंजार दमण गंगा पाण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण व गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांत करार झाला होता.

 

या करारात मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचे लक्षात आल्याने फडणवीसांनी हा करारच अमान्य केल्याची माहिती गडकरींनी दिली.  तर  दुसरीकडे मराठवाड्याचे पाणी पश्चिम महाराष्ट्राने पळवल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात मान्य केले. 

 

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणांतर्गत  औसा-चाकूर या ५५ कि.मी., चाकूर-लोहा  ११४ कि. मी. व लोहा - वारंगा १८७ कि.मी. रस्त्यांचे चौपदरीकरणच्या कामाचे तसेच नांदेड-उस्माननगर-कंधार-जांब-जळकोट या ६५ कि.मी., उस्माननगर-मुखेड-कुंद्राळ या ५२ कि.मी. रस्त्यांचे, कुंद्राळ-बीहारीपूर-हनेगांव- वझर या ५२ किमी रस्त्यांचे, अर्धापूर-तामसा- हिमायतनगर ६४ किमी रस्त्यांचे, हिमायतनगर-फुलसावंगी ६४ किमी रस्त्यांचे, जळकोट-उदगीर-तोगरी या ६५ कि.मी रस्त्याचे, रावी-देगलूर या ९५ किमी रस्त्याचे व आदमपूर फाटा-कार्ला या १३९ किमी रस्त्याच्या पूनर्बांधणी व दर्जा उन्नतीची कामे अशा एकूण ५ हजार ३४३ कोटी खर्चाच्या ५४८ किमी  मार्गाचे ई-भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. 

 

ज्यांची दुकानदारी बंद  त्यांनी जातीयवाद केला  
जातीवर मते घेणारे कधीच जातीचा विकास करत नसतात. ते स्वत:चा विकास करतात. विकास हा जात, धर्म, भाषा, लिंग यांच्याशी जोडला जाऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी बांधील राहून अामचे सरकार काम करत अाहे. ज्यांची दुकानदारी बंद झाली अाहे, त्यांनी जातीयवाद, संप्रदायवाद करत मुस्लिम व दलितांना फूस लावण्याचा उद्याेग सुरू केल्याची टीका नितीन गडकरी यांनी  नांदेड येथे केली.  

 

उलट्या बोंबा : खा. चव्हाण
ज्यांची दुकानदारी बंद झाली त्यांनी जातीजातींत भांडणे लावण्याचा उद्योग सुरू केला, या केंद्रीय मंत्री  गडकरी यांच्या आरोपाचा समाचार घेत चोराच्या उलट्या बोंबा, असा पलटवार खासदार अशोक चव्हाण यांनी केला. नांदेड येथील  काँग्रेसच्या जाहीर सभेत ते बोलत होते. 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, मराठवाड्याच्या वाट्याच्या २१ पैकी १४ टी.एम.सी. पाण्याचा पत्ताच लागत नाही... 

बातम्या आणखी आहेत...