आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लाख रुपयांची लाच घेताना जीएसटी अधिकारी अटकेत; उस्मानाबादेत कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- व्यापाऱ्याकडून १ लाखाची लाच घेताना उस्मानाबादेत जीएसटी कार्यालयाचा अधिकारी बलभीम आगरकरला एसीबीने मंगळवारी अटक केली. आगरकरने एका नोंदणीकृत व्यापाऱ्याला २०१५-१६ या वर्षाच्या व्हॅटप्रकरणी नोटीस बजावली होती. सुनावणी घेऊन नोटीस फाइल करण्यासाठी तसेच यापूर्वीच्या व्हॅट प्रकरणात कारवाई न करण्यासाठी ३ लाखांची मागणी केली होती. उस्मानाबादेतील विक्रीकर कार्यालयातच लाचेचा पहिला १ लाख रुपयांचा हप्ता स्वीकारताना आगरकरला रंगेहाथ अटक झाली. 
बातम्या आणखी आहेत...