आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलेक्टर कचेरीसमाेरच महिलेची प्रसूती, मुलगी जन्मली, समाेरच रथातून ‘बेटी बचाव, पढाव’च्या घाेषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- पंतप्रधान घरकुल आवास याेजनेंतर्गत घरकुल दिले जात अाहेत. मात्र बीड तालुक्यातील वासनवाडी येथील गर्भवती महिला सुरेखा शिवाजी पवार यांच्यासह अन्य कुटुंबातील सदस्यांनी चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर उपाेषण सुरू केले. उपाेषणकर्त्यांमध्ये गर्भवती महिला असल्याची माहिती असतानाही जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलिस दल, जिल्हा रुग्णालय या प्रमुख विभागांकडून दिवस-रात्र संबंधित गर्भवती महिलेच्या जीवितासंबंधी काेणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. अखेरीस उपाेषणाच्या चाैथ्या दिवशी साेमवारी पहाटे दीड वाजता कलेक्टर कचेरीसमाेरच उपाेषणकर्ती महिलेची प्रसूती झाली अन् मुलगी जन्मली. साेमवारी सकाळी बेटी बचावाे बेटी पढाअाेचा माेठा रथ (टेम्पाे) कलेक्टर कचेरीसमाेर जनजागृती करत हाेता अन् त्याच कार्यालयासमाेर जन्म हाेऊन बारा तास उलटून गेले तरी त्या मातेला अाणि नवजात बाळास उपचार मिळाले नाही. त्यामुळे  जिल्हा प्रशासनाचा बेफिकरीपणा उघडकीस अाला.   


बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर नऊ महिन्यांची गर्भवती असलेली सुरेखा शहाजी पवार या महिलेसह कुटुंबीयांनी अाणि अन्य घरकुलाच्या मागणीसाठी १५ मार्च २०१८ पासून उपाेषण सुरू केले अाहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील एकाही अधिकाऱ्यांनी घरकुलाच्या मागणीसंदर्भात चाैकशी केली नाही की गर्भवतीचीही चाैकशी केली नसल्याचा अाराेप िशवाजी पवार व अन्य उपाेषणकर्त्यांनी केला. पवार म्हणाले, शनिवारी पाेलिसांनी सुरेखाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, पण उपचार मिळाले नाही अन् परिचारकांकडून चांगली वागणूक मिळाली नाही व गाेळ्या-अाैषधे मिळत नसल्याने पुन्हा कलेक्टर कचेरीसमाेर सुरू असलेल्या उपाेषणस्थळी आम्ही दोघे दाखल झालो. साेमवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास सुरेखा िहला त्रास सुरू झाला. उपाेषणात सहभागी अन्य महिलांनी  प्रसूती केली व मुलगी जन्मल्याचे सांगितले. मुलीचा जन्म हाेऊनही साेमवारी दुपारी दीड वाजेपर्यंत म्हणजे बारा तास अाेलांडून गेले तरी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून, जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरांकडून काेणाकडूनही िवचारपूस अाणि तपासणी झाली नाही. घरकुलासाठी अाम्ही लढत असलाे तरी मुलगी जन्मली तरी उपचाराच्या सुविधा मिळत नाही ही शाेकांतिका अाहे, असे मुलीचे वडील पवार यांनी सांगितले.   

 

माझ्या मुलीसाठी मीच लढणार   

अाम्हाला घर नाही यासाठी अाम्ही ग्रामपंचायतीमध्ये चकरा मारत अाहोत. मी गराेदर असतानाही उपाेषणाला बसणार असल्याचे पत्र कलेक्टर साहेबाला ७ मार्च राेजी दिले हाेते, मात्र काही झाले नाही. म्हणून मी देखील कुटुंबासाेबत १५ मार्चपासून उपाेषणाला बसण्याचा निर्णय घेतला. गराेदर महिला उपाेषणाला बसली म्हटल्यावर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. पण कुणीच मदतीला अालं नाही. शासनानं साधी विचारपूसही केली नाही. म्हणून अाता मीच मुलीचा लढा लढायचा ठरवलाय. तिला न्याय मिळेपर्यंत व हक्काचं घर मिळेपर्यंत मी लढतच राहणार असं मत बाळाची अाई सुरेखा पवार यांनी व्यक्त केलं. तर शनिवारी पाेलिसांनी जिल्हा रुग्णालयातील महिला कक्षामध्ये पत्नीला उपचारासाठी दाखल केले, मात्र तेथे चांगली वागणूक मिळाली नाही. म्हणून रुग्णालय साेडले रविवारी रात्री दीड वाजता रस्त्यावरच प्रसूती झाली. मात्र अद्यापपर्यंत रुग्णालयातून काेणीही अाले नाही.   असा अाराेप बाळाचे वडील शहाजी पवार यांनी केला अाहे. 

 

त्यांची बाजू एेकून घेतली जाईल   
घरकुलाच्या मागणीसाठी उपाेषण सुरू अाहे, त्यांची बाजू एेकून घेतली जाईल. नियमात जे असेल ते त्यांना मिळेल. प्रसूती झालेल्या महिलेसंर्भात पाेलिस दल अाणि जिल्हा रुग्णालयाशी संपर्क करून याेग्य ती कारवाई केली जाईल.   
- चंद्रकांत सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी.   

 

पाेलिसांना रविवारी सकाळीच कळवले   
जिल्हा रुग्णालयामध्ये दाेन महिला उपचारासाठी दाखल झाल्या हाेत्या. त्यांच्यावर उपचार केेले गेले, मात्र अचानक त्या दाेन्ही महिला निघून गेल्या याची माहिती अाम्ही रविवारी पाेलिसांना दिली. कुठे प्रसूती झाली यांची काहीच माहिती नाही; पाेलिसांकडून माहिती घेऊन उपचार केले जाईल.   
- संजय पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी   

 

नऊ महिने पूर्ण झाले गं बाई, दवाखान्यात चल   
उपाेषण करणाऱ्या गराेदर महिलेकडे मी लक्ष देत हाेते. रविवारी (िद. १८) रात्री अाठ वाजेपर्यंत बसून सांगितले की, नऊ महिने पूर्ण झाले गं बाई, दवाखान्यात चल मात्र तिने एेकले नाही. अखेर रात्री घरी जाताना माेबाइल नंबर दिला. काही अडचण अाली तर फाेन कर असेही सांगितले.   
- अाशा सिरसट, महिला पाेलिस नाईक, कलेक्टर पाेलिस चाैकी   

बातम्या आणखी आहेत...