आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदारांच्या दालनात मनोलीच्या 4 शेतकऱ्यांनी विष घेतल्याने खळबळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - मानवत तालुक्यातील मानोली येथील चार शेतकऱ्यांनी गावातील विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि.१९) पावणेे अकराच्या सुमारास मानवत येथील तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांच्या दालनात  विष प्राशन करून आत्महत्येचा  प्रयत्न केला.  


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे गुरुवारीच जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या या प्रकाराने मोठी खळबळ उडाली.   मानोली येथील १५ ग्रामस्थांनी १० एप्रिल रोजी गावच्या प्रश्नांसंदर्भात तहसीलदारांना निवेदन दिले होते. यात गावाला मिळालेल्या निधीतील गैरव्यवहाराची चौकशी करावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी व २२ बोगस बंधाऱ्यांची चौकशी करण्यात यावी आदी विविध मागण्याचा समावेश होता.

 

या प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास १९ रोजी सामूहिक आत्महत्येचा इशारा देखील दिला होता. त्यानुसार मानोलीतील लक्ष्मण शिंदे, चंद्रकांत तळेकर, दत्ता कदम, शेख शगीर हे मानवत तहसील कार्यालयात सकाळी दाखल झाले. तहसीलदाराच्या दालनात जाऊन त्यांनी विष घेण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. चौघांनाही तातडीने उपचारासाठी मानवत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघांची प्रकृती स्थिर आहे. तर चंद्रकांत तळेकर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हालवण्यात आले .

बातम्या आणखी आहेत...