आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात ५ जिल्ह्यांत ३० टक्क्यांपेक्षा कमी पेरणी; जालना २३ तर नांदेड, हिंगोलीत ५३ टक्के पेरण्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यात जून महिना संपला तरी अजूनही केवळ ३३ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. मराठवाड्यात खरिपाचे ४९ लाख १० हजार ९०० हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी १६ लाख ५३ हजार २०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. जालना, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांत ३० टक्क्यांपेक्षा कमी पेरण्या झाल्या आहेत. १३ तालुक्यांत तर १०० मिमी पेक्षा कमी पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस मुदखेडला ४३४ मि.मी. झाला आहे. 


जालना जिल्ह्यात ३० जून अखेर केवळ २३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. तेथील ५ लाख ७९ हजार ३०० हेक्टरपैकी केवळ १ लाख ३६ हजार ६०० हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. तर बीड जिल्ह्यात ७०९३०० हेक्टर खरिपाच्या क्षेत्रापैकी २०६२०० हेक्टरवर पेरण्या झाल्या. परभणी जिल्ह्यात ६ लाख ३२२०० हेक्टरपैकी १ लाख ७९ हजार १०० हेक्टरवर पेरण्या झाल्या. हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक ५३ टक्के म्हणजे ६ लाख ३ हजार ८०० पैकी १ लाख ४३हजार २०० हेक्टरवर, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ४ लाख ७२ हजार ६०० खरिपाच्या क्षेत्रापैकी १ लाख ९ हजार २०० हेक्टरवर पेरण्या झाल्या. मराठवाड्यात १३ तालुक्यांत १०० मिमी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. यात पैठण ८० मिमी, सिल्लोड ८७, वैजापूर ८८, गंगापूर ७१, खुलताबाद ८२,भोकरदन ८९, जाफराबाद ४९, अंबड ८३, घनसावंगी ८२, पाथरी ७८, बीड ९९, गेवराई ८४, शिरुर कासार ८८ आणि वाशीत ९१ मिमी पाऊस झाला. 


कापसाची सर्वाधिक लागवड 
मराठवाड्यात कपाशीची ६ लाख ३८ हजार ४०० हेक्टरवर तर सोयाबीन ६ लाख १३ हजार ९००, मूग ५४ हजार ९०० हेक्टर, तुरीची १ लाख ४३ हजार ७०० हेक्टर तर मक्याची ८४ हजार ७०० आणि बाजरीची २० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...