आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

21 वर्षीय आजारी तरूणीवर भोंदूबाबाने 6 वर्षे केला लैंगिक आत्याचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- शिक्षणात हुशार असलेल्या मात्र नेहमी आजरी राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरूणीवर उपाचाराच्या नावाखाली भोंदूबाबाने सहा वर्षे लैंगिक आत्याचार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी बीड तालुक्यातील कर्झणी येथे उघडकीस आली आहे. तरूणीने लग्नासाठी अग्रह धरल्यानंतर भोंदूबाबाने तिला विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सध्या या तरूणीवर बीडच्या जिल्हा रुग्नालयात उपचार सुरू आहेत.

 

पीडित मुलगी मुळची केज तालुक्यातील रहिवाशी असून उसतोड मजूर कुटुंबातील आहे. सहा वर्षांपूर्वी सतत आजारी पडत असल्यामुळे वडिलांनी तिला उपचारासाठी दासखेड (ता. पाटोदा) येथे नेले. तेथे कर्झणी येथील भोंदूबाबा आपल्या स्वत:च्या अपंग मुलीला उपचारासाठी घेऊन आला होता. त्याने तरूणीच्या वडिलांना मुलीला माझ्याकडे ठेवा मी तिच्यावर उपचार करतो असे सांगून कर्झणी येथे नेले. तेथे बाबाने तिच्यावर अमानुष अत्याचार आणि लैंगिक आत्याचार केले.

बातम्या आणखी आहेत...