आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड- पक्षांच्या नेत्यांसमोर जोशमध्ये भाषण करणे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा फड यांना चांगलेच महागात पडले आहे. भाषणादरम्यान केजचे पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी रेखा फड यांच्यावर बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भाजप, शिवसेना सरकारविरोधात राष्ट्रवादीची राज्यभर हल्लाबोल यात्रा सुरू आहे. १७ जानेवारी रोजी बीड जिल्ह्यात ही यात्रा होती. बुधवारी दुपारी पाटोदा येथील सभेनंतर रात्री बीड शहरातील सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स परिसरात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक, माजी मंत्री तथा आ.राजेश टोपे, चित्रा वाघ, संदीप क्षीरसागर, रेखा फड यांची उपस्थिती होती. याच सभेत रेखा फड यांचेही भाषण झाले. यावेळी बोलत असताना गुन्ह्यांचा तपास लावत नसल्याने आपण पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांना वारंवार धमक्या दिल्याचे सांगीतले, तसेच केजचे पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे हे विकाऊ असल्याचे सांगत त्यांच्याबद्दलही अपशब्द वापरले होते. भर सभेत पोलीस अधिकार्यांबद्दल असे अपशब्द वापरल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत चौकशी करून शुक्रवारी पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.