आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच्चू कडू यांनी घेतला दानवे यांचा खरपूस समाचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन - शेतकऱ्यांना शिवी दिलेली या पुढे खपवून घेणार नाही.  आता दारापर्यंत आलो पुढे घरात घुसू , असा खनखणीत इशारा देत दानवेंच्या वक्तव्याचा बच्चू कडू यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला.  भोकरदन येथे नगर परिषद कार्यालया समोर संपन्न झालेल्या आसूड यात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. 

 

बच्चू   कडू म्हणाले की आमची जात शेयकऱ्याची आहे सर्वच राजकीय पक्ष जातीचे राजकारण करतात त्यांनीच त्याचे कार्यकर्ते बरबाद केले. आमची प्रहार संघटना नेत्या ची नव्हे तर सच्या कार्यकर्त्यांची आहे आमचे काम लोकांना पसंत असल्याने ते आम्हाला जोडले गेले.


आत्तापर्यंत नुकसान झालेल्या बोंड आळी व तुरी चे पैसे अजूनही मिळाले नाही. लवकर भरपाई न मिळाल्यास पालकमंत्र्याला घेराव घालू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.जालना लोकसभा निवडणूक मी माझ्या साठी नाहीतर शेतकऱ्यां साठी लढणार तुमचा सर्वाचा विचार घेऊनच निर्णय 9 ऑगस्ट क्रांती दिनी जाहीर करू मला नेते नको तर सच्चे कार्यकर्ते हवे. असे ते यावेळी म्हणाले  

बातम्या आणखी आहेत...