आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीची घोषणा होऊन वर्ष, अद्याप हजारो शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीची घोषणा होऊन वर्ष लोटले तरी अद्याप हजारो शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत. तब्बल १८ हजार शेतकरी तर ग्रीनलिस्टमध्ये नाव येऊनही केवळ त्यांच्या शासनाकडून आलेल्या कर्जाची आणि बँकेकडील आकड्यांचा मेळ लागत नसल्याने ते अडकून पडले आहेत.


राज्यातील आकडा १८०००
शासनाकडून कर्जमंजुरीची ग्रीनलिस्ट जाहीर केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त किंवा कमी रक्कम कर्जमाफीअंतर्गत मंजूर झाली. ही बाब लक्षात आल्यानंतर बँकांनी राज्यपातळीवर माहिती घेऊन माहिती पुन्हा अपडेट करून पाठवली. त्यानुसार राज्यभरात १८ हजारांवर शेतकऱ्यांची कर्जमाफी या प्रक्रियेत अडकली आहे. त्यामुळे नव्याने कर्ज घेण्यातही त्यांची अडचण झाली आहे. राज्य शासनाने जून २०१७ मध्ये शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र, शेतकऱ्यांची ग्रीनलिस्ट जाहीर करण्यास दिवाळी उलटून गेली होती. 

बातम्या आणखी आहेत...