आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात 15 दिवसांत 767 गावे जलयुक्त करण्याचे आव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवाड्यात जलयुक्त शिवारअंतर्गत २०१६- १७ वर्षासाठी १५१८ गावांची निवड करण्यात आली होती. यामध्ये ७५१ गावे शंभर टक्के पूर्ण झाले असून अजूनही ७६७ गावांचे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान आहे. मराठवाड्यात आत्तापर्यंत ५७९ कोटी रुपयांचा खर्च यावर करण्यात आला आहे. मार्चपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी दिली आहे.

 

मराठवाड्यात जलयुक्त शिवारअंतर्गत औैरंगाबाद जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांत अजूनही जलयुक्त शिवारची कामे संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीची कामे मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.

 

औरंगाबाद जिल्ह्यात २०० गावे पूर्ण
औरंगाबाद जिल्ह्यात २०१६-१७ अंतर्गत २२३ गावे निवडण्यात आली आहेत. यामध्ये २०० गावे शंभर टक्के पूर्ण झाली आहेत, तर २० गावांत ८० टक्के आणि ३ गावांत ५० टक्के पूर्ण झाली आहेत. तर जालना जिल्ह्यात १८६ पैकी १५२, बीड २५६ पैकी १०६, परभणी १६० पैकी ५८, हिंगोली १०० पैकी ६३, नांदेड २२६ पैकी १२४ गावे शंभर टक्के पूर्ण झाली आहेत. तर लातूरमध्ये १७६ पैकी १६ आणि उस्मानाबादेत १९१ पैकी ३२ गावे पूर्ण झाली आहेत.

 

मार्चअखेरपर्यंत कामे करण्याचे आदेश
मार्चअखेर २०१६-१७ ची कामे पूर्ण करायची आहेत. तर २०१७-१८ ची कामे जूनपर्यंत पूर्ण करायची आहेत. याचा आढावादेखील घेतला आहे. निधीची कोणतीही समस्या नसून कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

-पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त

 

बातम्या आणखी आहेत...