आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
परभणी- साडेतीन वर्षांत महाराष्ट्रातील रस्ते विकासासाठी भरीव निधीची तरतूद करताना ती कामे मार्गी लावली. महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी ५ लाख कोटींची आणि त्यात मराठवाड्यासाठी विशेष तरतूद म्हणून १ लाख कोटींची तरतूद केली असल्याची घोषणा केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी येथे केली. जिल्ह्यात ३,५०० कोटींच्या रस्ते विकास कामांचे ई-भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्या वेळी गडकरी बोलत हाेते.
गडकरी म्हणाले, पाणी, रस्ते, वीज व दळणवळणाची साधने या चारच बाबींवर विकास अवलंबून असतो. त्याशिवाय उद्योग येणार नाहीत. राज्यात मंत्री असताना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे काम पूर्ण केल्यानंतर पुण्याचा झालेला विकास लक्षात घेण्याजोगा आहे. याच धर्तीवर राज्यात रस्त्यांसाठी ५ लाख कोटींची तरतूद केली जाईल, असेही गडकरी म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.