आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालातूर- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली असली तरी राज्यातील खड्डे आजही कायम असल्याचे पाहून अजित पवार यांनी शुक्रवारी धनंजय मुंडेंना खड्ड्यांची सेल्फी काढून बांधकाम मंत्र्यांना ट्विट करण्याचा सल्ला दिला.
शुक्रवारी सकाळी औसा येथील हल्लाबोल सभा झाल्यानंतर निलंगामार्गे उदगीरला जात असताना अजित पवारांना रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रचंड त्रास झाला. रस्त्याची पाहणी करण्यासाठी ते गाडीखाली उतरले. या वेळी धनंजय मुंडे यांनी त्यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी चालवलेल्या खड्ड्यांसोबत सेल्फी अभियानाची आठवण करून दिली. त्यावर पवारांनी “धनंजय... आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींना या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, तर रोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या सामान्य माणसांचे काय हाल होत असतील? मला काही ते सेल्फी बेल्फी जमत नाही.
तूच या खड्ड्यांची सेल्फी काढून त्या चंद्रकांत पाटलांना पाठव रे बाबा...’ असे सांगितले. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मुंडे यांनी मग तत्काळ आपल्या फोनमधून त्या खड्ड्यांसह सेल्फी काढत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना ट्विटरवर पाठवला.
सेल्फी विथ खड्डा
औसा येथील हल्लाबोल सभा संपल्यानंतर उदगीरकडे निघालेले माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते खड्ड्यांमुळे त्रासून गेले. अजित पवार आपल्या वाहनातून खाली उतरले आणि त्यांनी धनंजय मुंडे यांना खड्ड्यांसोबत सेल्फी काढण्यास सांगितले.
> अजित पवार म्हणाले, लोकप्रतिनिधींना या रस्त्याचा त्रास आहे, तर रोज या रत्यावरून जाणाऱ्या सामान्य माणसांचे काय?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.