आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसांवर दरोडेखोरांची दगडफेक, तिघे जखमी; अाष्टी तालुक्यात थरार;चाैघे फरार,1 अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो... - Divya Marathi
सांकेतिक फोटो...

आष्टी- दरोडा टाकण्यासाठी  दुचाकीवरून जाणाऱ्या पाच दरोडेखोरांचा पाठलाग करणाऱ्या पाेलिसांवर दुचाकीवरील दराेडेखाेरांनी तुफान दगडफेक केली. यात तीन पाेलिस जखमी झाले. अंधाराचा फायदा घेऊन चार दरोडेखोर पसार झाले. त्यांचा एक साथीदार सचिन ईश्वर भोसले (रा. वाहिरा) याला जेरबंद करण्यात पाेलिसांना यश अाले. अाष्टी तालुक्यातील कानडी शिवारात रविवारी रात्री हा थरार झाला. न्यायालयाने सचिनला तीन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली अाहे.  ताे साेलापूर व अाैरंगाबाद पाेलिसांना अनेक गुन्ह्यात हवा अाहे.   


कानडी शिवारातील बंधाऱ्याच्या बाजूस नदीपात्राजवळ आटल्या ईश्वर भोसले, सचिन ईश्वर भोसले, सोन्या व त्यांच्यासोबत अन्य साथीदार अाष्टी व कडा येथे दरोडा टाकण्याच्या  तयारीने दोन दुचाकीवरून येत असल्याची माहिती   आष्टी पोलिसांना रविवारी रात्री मिळाली होती. या माहितीच्या आधारे १५ जणांच्या पथकाने शिवाराकडे धाव  घेतली. दोन  पथके करून त्यांनी सापळा लावला. दराेडेखाेर अाल्याची चाहूल लागताच पाेलिसांनी  टॉर्च सुरू करून  दुचाकीवरील दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. काही पाेलिसांनी अाराेपींची एक दुचाकी अडवली, मात्र त्यांनी गाडी पाेलिसांच्या अंगावर घालून त्यांना खाली पाडले व पलायन केले. यात दाेन पाेलिस जखमी झाले. पोलिस राणा गुजर आणि शंकर  कळसाने यांनी  एका दरोडेखोराला पकडले तर अंधाराचा फायदा घेऊन दुसरा  पसार झाला. पोलिसांनी दुसऱ्याही  दुचाकीचा पाठलाग केला, मात्र या दोन दरोडेखोरांनी  पोलिसांवर तुफान दगडफेक करत पलायन केले. या दगडफेकीत पोलिस  पिंपळे हे जखमी झाले.    

 

आटल्या भाेसलेवर मोक्कासह आठ गुन्हे   
फरार दरोडेखोर आटल्या भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मोक्कासह अन्य आठ गुन्हे दाखल आहेत.तर  ईश्वर भोसले हा काही दिवसांपूर्वीच एका गुन्ह्यात जामिनावर सुटला आहे. घरफोडी, जबरी चोरी यात तो बीड- नगर शिवारात म्होरक्या म्हणून काम करतो. या कारवाईतील उर्वरित आरोपी लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक सय्यद शौकत अली यांनी सांगितले.

 

दरोडेखोराकडे चॉपर  
सचिन ईश्वर भोसले (रा. वाहिरा) हा औरंगाबाद ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमधील अनेक गुन्ह्यात ‘वाँटेड’ आहे. त्याच्याजवळून चॉपर, एक मोबाइल व  मोटारसायकल (एमएच १६ बीएक्स ४७८७) जप्त  केली. दुचाकीवरील  आटल्या ईश्वर भोसले, ईश्वर भोसले  यांच्यासह अन्य एक दरोडेखोर पळून गेला.

बातम्या आणखी आहेत...