आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमसंबंधातून दोघांवर हल्ला, एक गंभीर; जालन्यातील सिटिजन चौकात घडली घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- प्रेमसंबंधातून दोघांना जबर मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री शहरातील सीटीझन कॉर्नरजवळ घडली. यातील एक युवक गंभीर जखमी असून त्यास उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुगणालयात दाखल केले. तर पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 


बाळासाहेब जीजाभाऊ शिरसाठ व कृष्णा काकासाहेब शिरसाठ (पाडळी, ता.बदनापूर) हे बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास सीटीझन कॉर्नर येथे त्यांची रिक्षा (एमएच. २० ईएफ ३००९) घेऊन प्रवाशांची वाट पाहत होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने बाळासाहेब शिरसाठ यांचा मोबाइल हिसकावून व फायटरने मारहाण केली तर दुसऱ्या आरोपीने कृष्णा शिरसाठचा पाठलाग करून केलेल्या मारहाणीत कृष्णा गंभीर जखमी झाले. यासंदर्भात चंदनझिरा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन त्यांना रुगणालयात दाखल केले. वर्णनावरून पोलिसांनी शास्त्री मोहल्ला येथे चौकशी केली व सदर वर्णनाचे संशयित शोएब चाऊस व अरबाज शेख यांना ताब्यात घेतले. 


प्रेमाच्या त्रिकोणातून प्राणघातक हल्ला 
गंभीर जखमी कृष्णाचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्या महिलेसाेबत शोएबचे प्रेमसंबध जुळले. त्यानंतर शोएब व कृष्णा यांच्यात वाद झाला. दरम्यान शोएबने कृष्णा यास दर्शना हॉटेलसमोर बोलावून कृष्णावर प्राणघातक हल्ला केला. 

बातम्या आणखी आहेत...