आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळी येथील खोदकामात सापडलेली ती मुर्ती सुर्य भगवानाची

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई -परळी-अंबाजोगाई महामार्गाच्या चौपदरी करणाच्या कामासाठी कन्हेरवाडी परीसरात डोंगर खोदुन मुरुम भरण्याचे काम चालु असतांनाच्या खोदकामात सापडलेली मुर्ती ही भगवान विष्णुची नसुन सुर्य भगवानाची आहे असे स्पष्टीकरण औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाचे समन्वयक तथा इतिहास आणि पुरतत्व विभागाचे गाढे अभ्यासक    मयुरेश खडके यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना परळीचे तहसीलदार शरद झाडके यांनी सदरील मुर्ती ही नेमकी कशाची आहे हे पुरातत्व विभागाचे कर्मचारीच सांगु शकतील असे मत व्यक्त करुन सदरील स्थळाचे पुढील खोदकाम हे पुरतत्व विभागाच्या देखरेखीखालीच व्हावे असे म्हटले आहे.
    काल दुपारी कन्हेरवाडी शिवारातील खोदकामाच्या वेळेस ही मुर्ती आणि जिवंत कवड्याधारी नाग सापडल्यानंतर या बाबतच्या विविध अफवांना पेव फुटले होते. ही घटना समजताच परळीचे तहसीलदार शरद झाडके यांनी भेट देवून सदरील खोदकाम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले होते व सदरील माहिती औरंगाबाद येथील पुरातत्व विभागास कळवून या ठिकाणी आपला प्रतिनिधी पाठवून या बाबतची अधिकृत माहिती द्दावी असे कळवले होते. यानंतर पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अजित खंदारे यांनी अंबाजोगाई येथील एतिहासिक संकलेश्वर मंदीर उत्खनन कामासाठी खास औरंगाबाद येथून आलेले पुरातत्व विभागाचे समन्वयक मयुरेश खडके यांना घटनास्थळी भेट देवून अहवाल देण्याबाबतचे आदेश दिले होते.
सदरील आदेशानुसार मयुरेश खडके यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देवून पहाणी केली असता सदरील मुर्तीच्या दोन्ही हातात कमळाचे फुल असल्यामुळे ही मुर्ती सुर्य भगवानाचीच असल्याचे सांगितले. भगवान विष्णुच्या हातात शंख, चक्र, गदा,आणि पदम असते. तर सुर्य भगवानाच्या दोन्ही हातात कमळाचे फुल असते त्याप्रमाणे या मुर्तीच्या हातात ही कमळाचे फुल असल्याने ही मुर्ती सुर्य भगवानाची असल्याचे सांगितले.
सदरील मुर्तीचा फक्त छायाचित्रात दिसतो तेवढाच भाग आढळून आला आहे. यामुर्तीचा खालचा भाग आढळून आलेला नसल्यामुळे किंवा पुरणमंदीर वा वास्तु असल्याचे कोणतेही संकेत या ठिकाणी सकृतदर्शनी दिसत नसल्यामुळे ही अर्धवट तुटलेली मुर्ती अनेक वर्षापुर्वी याठिकाणी टाकलेली असावी आणि ती दबली गेलेली असावी. सदरील खोदकाम चालू असतांना ती सापडली असावी एवढाच काय तो संदर्भ या घटनेशी असावा असे मयुरेश खडके यांचे मत आहे.
    पुरातत्त्व विभागाचे समन्वयक मयुरेश खडके यांनी व्यक्त केलेल्या स्पष्ट मतामुळे यासंदर्भात कालपासून सुरु असलेल्या वेगवेगळ्या अफवांची चर्चा बंद होईल असे वाटते.मला वाटते, त्या ठिकाणी आणखीन खोदकाम होणे आवश्यक आहे, त्यानंतरच या निष्कर्षापर्यंत पोहचता येईल. 
पुरातत्व विभागानेच पुढील खोदकाम करावे.
सदरील खोदकामात सापडलेली मुर्ती ही कोणत्या देवाची आहे याबाबत मुर्ती अभ्यासकच सांगू शकतील. मात्र सदरील ठिकाणचे पुढील खोदकाम हे पुरातत्व विभागाने त्यांच्या उपस्थितीच करावे असे मत परळीचे तहसीलदार शरद झाडके यांनी व्यक्त केले आहे

 

पहा पुढील स्लाईडवर आणखी छायाचित्रे ..... 

बातम्या आणखी आहेत...