आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड: आरोपी, नातलगाकडून तीन पोलिसांना मारहाण; दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - सातारा जिल्ह्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या सातारा आणि बीडच्या पोलिसांना आरोपी आणि त्याच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना नाळवंडी येथील लक्ष्मी तांड्यावर घडली. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


बीड तालुक्यातील नाळवंडी तांडा येथील गोवर्धन लक्ष्मण राठोड आणि मैदा         येथील देविदास मोतीराम राठोड या ऊसतोड मुकादमावर उचल घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील भुईज ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांना अटक करण्यासाठी २३ मे रोजी भुईज ठाण्याचे पोलिस कर्मचारी जितेंद्र इंगुळकर आणि भोसले हे बीड जिल्ह्यात आले होते. त्यांनी पिंपळनेर पोलिसांना सदर प्रस्तावित कारवाईबद्दल कल्पना दिली असता पोलिस कर्मचारी कांदे यांना त्यांच्यासोबत मदतीला देण्यात आले. या सर्वांनी लक्ष्मी तांडा येथे जाऊन गोवर्धन राठोड यास ताब्यात घेतले असता त्याने हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

 

‘तुम्हाला महागात पडेल’ अशी धमकी तो देऊ लागला. त्याचा गोंधळ ऐकून त्याची पत्नी राधाबाई राठोड, सून सुनीता राठोड, मुलगा संजय राठोड तसेच त्याच गावातील शिवाजी लिंबा राठोड, नरहरी काशीनाथ राठोड, चंद्रकांत रेखू राठोड (सर्वजण रा. नाळवंडी लक्ष्मी तांडा) हे तिथे जमा झाले.  त्यांनी तिन्ही पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण केली.  याप्रकरणी पोलिस कर्मचारी जितेंद्र इंगुळकर यांच्या तक्रारीवरून  दहा जणांवर पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

म्हणे, पत्रकारांना बोलावू
लक्ष्मी तांड्यावर तपासासाठी गेलेल्या पोलिसांना आम्ही माध्यमांना, पत्रकारांना या ठिकाणी बाेलावू, तुम्हाला हे महागात पडेल असा फसवणूक प्रकरणातील आरोपीने दम दिला असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...