आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागद- सध्या बाजार समितीमध्ये मका खरेदी बंद असल्याने शेतकरी गावातच खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने मका विक्री करत आहेत. काही धोकादायक ठिकाणी खरेदीचे व्यवहार मांडल्याने एका दुर्घटनेत एकाचा जीव थाेडक्यात बचावला. ही घटना नागदमध्ये गुरुवारी घडली.
मनोज जैन या शेतकऱ्याने आपला मका ट्रॅक्टरने व्यापाऱ्याकडे विक्रीस अाणला होता. चालक विनोद पाटील याने ट्रॉली रिकामी करण्यास वर केली असता जमिनीपासून १० मीटरवरील ३३ केव्हीच्या तारेला ट्रॉली चिकटली. हे लक्षात येताच चालकाने ट्रॅक्टरमधून उडी मारत स्वत:चा जीव वाचवला. पण चालकाने अद्याप ट्रॉली रिकामी का केली नाही हे पाहण्यासाठी मनोज जैन हे ट्रॉलीपाशी आले. तेव्हा तेथे कुणीच दिसले नाही. त्यांनी ट्रॉलीला हात लावताच ते चिकटले. हा प्रकार घडला तेव्हा व्यापारी नीलेश जैनसह काही जण तेथे हजर होते. पण उच्च दाबाची वाहिनी असल्याने कुणीही ट्रॅक्टरला हात लावण्यास धजत नव्हते. दहा मिनिटांनी एका ग्रामस्थाने बांबूच्या साहाय्याने तार वर उचलले व महावितरणला कळवत लाइन बंद करून घेतली. तोपर्यंत ट्रॅक्टरचे तीन टायर फुटले. मनोज यांना उपचारासाठी चाळीसगावला हलवल्याने ते बचावले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.