आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीचा विनयभंग, महिलेची छेड; आरोपीला सात वर्षे शिक्षा; न्यायालयाने सुनावली शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई- परळी येथील महिला महाविद्यालयात अकरावीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग  व  एका महिलेची छेडछाड करणे  अशा दोन्ही गुन्ह्यात  तालुक्यातील इंजेगाव येथील एका आरोपीस अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही.हांडे  यांनी  दोषी ठरवत सात वर्षांची शिक्षा व पाच हजार रु.दंड  अशी शिक्षा सुनावली. दंडापैकी ३ हजार रु.पीडित मुलीस देण्याचे आदेशही न्यायाधीशांनी दिले आहेत. 


परळीच्या महिला महाविद्यालयात  अकरावीत शिकणारी एक मुलगी महाविद्यालय सुटल्यानंतर गावी जाताना बसस्थानकामध्ये आली तेव्हा वसंत बब्रुवाहन कराड ( रा.इंजेगाव ) याने  मुलीला  दुचाकीवर बसवून जबरदस्ती केली.  त्याच्या हाताला हिसका देऊन मुलगी बसमध्ये बसून गावी निघाली. तेव्हा वसंत याने बसचा पाठलाग  करत मुलीचे गाव गाठून तिला जिवे मारण्याची धमकी दिली.  या प्रकरणी मुलीने परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात  दिलेल्या तक्रारीवरून १६ ऑक्टोबर २०१५ रोजी बाललैंगिक  कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी  सहायक पोलिस निरीक्षक अजित विसपुते यांनी या गुन्ह्याचे दोषारोप पत्र अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयात   दाखल केल्यानंतर या  प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश एस.व्ही.हांडे यांच्या समोर झाली. सरकार पक्षाच्यावतीने अॅड.लक्ष्मण फड यांनी पाच साक्षीदार तपासले. 


साक्षीदारांची व पीडित मुलीची साक्ष यात महत्त्वपूर्ण ठरली.न्यायाधीश  एस.व्ही.हांडे यांनी  आरोपी वसंत याला कराड चारही कलमान्वये दोषी  ठरवत ३५४ अ मध्ये दोन वर्ष १ हजार रु.दंड, ३५४ ड मध्ये ३ वर्ष-२ हजार दंड व बाललैंगिक कायदा १० प्रमाणे ७ वर्षे शिक्षा व  १ हजार रु.दंड व बाललैंगिक कायदा कलम १२ प्रमाणे २ वर्षे शिक्षा व १ हजार दंड अशी शिक्षा सुनावली. यातील ३ हजार रुपयांची दंडाची रक्कम पीडित मुलीस देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. सरकार  पक्षाच्या वतीने सहा.सरकारी वकील लक्ष्मण फड यांनी काम पाहिले. 

 

दुसऱ्या गुन्ह्यातही तीन वर्षांची शिक्षा  
१ सप्टेंबर २०१५ रोजी एक महिला महाविद्यालयातून  गावी  जाण्यासाठी निघाली तेव्हा दुपारी १२  वाजता  वाटेतच वसंत कराड व त्याचा बालमित्र श्रीनाथ कैलास दशवंत यांनी पाठलाग करून तिची छेडछाड केली.  हे दोन्ही गुन्हे परळी पोलिस ठाण्यात दाखल झाले. गुन्ह्यामध्ये ३५४ ड प्रमाणे २ वर्षे शिक्षा,  -१ हजार दंड, ५०६ प्रमाणे ३ वर्षे शिक्षा-५०० रु.दंड, बाललैंगिक कायद्याच्या कलम १० नुसार ३ वर्षे शिक्षा व  १ हजार दंड व बाललैंगिक कायदा कलम १२ नुसार १ वर्ष शिक्षा व ५०० रु.दंड याप्रमाणे तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.    या गुन्ह्यात सरकार पक्षाच्यावतीने अॅड.अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले. 

बातम्या आणखी आहेत...