आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवामृतावर घेतले 9 एकरांत गहू, हरभऱ्याचे पीक बीडमध्ये झीराे बजेट शेतीचा प्रयाेग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर- शेतात कोणतेही पीक घ्यायचे झाल्यास त्या पिकास खते, औषधाचा मोठा खर्च करावा लागतो. या खर्चामुळे कधी-कधी शेती तोट्यातही जाते. परंतु यावर उपाय म्हणून धारूर येथील शेतकरी नामदेव गोरे यांनी झीराे बजेटवर नैसर्गिक शेती करण्याचा जिल्ह्यात पहिला प्रयोग राबवला. यात नऊ एकर जमिनीत गाईचे मूत्र, शेण, गूळ व द्विदल धान्याचे पीठ वापरून तयार केलेल्या जिवामृतावर खपली गहू, हरभरा व दगडी ज्वारीचे पीक घेतले आहे.    


येथील शेतकरी नामदेव गोरे यांना धारूर शिवारात तांदळवाडी रोड लगत चाळीस एकर शेती आहे. सध्या ते पुण्यात राहत असल्याने त्यांचे चुलत भाऊ दत्ता गोरे व चार नाेकरांकडून शेती करून घेतली जात होती. परंतु रासायनिक खते व औषधाच्या वापराने शेती परवडत नव्हती. तसेच उत्पादनही पाहिजे तेवढे मिळत नव्हते. त्यांना पश्चिम महाराष्ट्रात सुभाष पाळेकर यांच्या नैसर्गिक शेतीची गतवर्षी माहिती मिळाली होती. गोरे यांनी पाळेकर यांच्या शेतात शिवार फेरी करून जिवामृतने केलेली नैसर्गिक शेती पाहिली.   असा प्रयोग आपल्या शेतात राबवावा अशी कल्पना सुचली. त्यांनी तांदळवाडी रोडलगतच्या  दोन एकर खपली व एक एकर बन्सी गव्हाची पेरणी केली आहे. खपली गहू  कसदार व पौष्टिक आहे. सध्या या गव्हास बाजारात आठ ते नऊ हजार रुपये क्विंटल भाव आहे. तसेच ३ एकर विजय हरभरा लागवड केली आहे. 


असे आहे जिवामृत  
गावरान गाईचे मूत्र, गाईचे शेण, गूळ व द्विदल धान्याचे पीठ मिक्स करून जिवामृत तयार होते. जिवामृत तयार करण्यासाठी एकरी तीनशे रुपये खर्च येतो. एका गाईपासून तीस एकरसाठी लागणारे जिवामृत तयार होते. 


शून्य बजेटची शेती  
नैसर्गिक शेती ही शून्य बजेटवर करता येते. ९ एकर शेती शून्य बजेटवर केली आहे. या शेतीमध्ये गहू, हरभरा व ज्वारीची पेरणी केली आहे . नैसर्गिक शेतीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सुभाष पाळेकर यांचे मला मार्गदर्शन लाभले. 
- नामदेव गोरे, शेतकरी.

बातम्या आणखी आहेत...