आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Car And Tanker Accident On The Nagar Pathardi Road

बाराबाभळी शिवारात अपघात; पोलिसासह तीन जण ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फाेटो. - Divya Marathi
फाईल फाेटो.
पाचोड - नगर- पाथर्डी रस्त्यावरील बाराबाभळी शिवारात शनिवारी (१५ ऑगस्ट) पहाटे झालेल्या टँकर व कार अपघातात पोलिसासह तीन जण ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. पुण्याकडे निघालेल्या कारने पाथर्डीकडे जाणाऱ्या टँकरला धडक दिली. त्यात कारमधील तिघे जागीच ठार झाले.

कारचालक विष्णू कल्याण वाघ (रा. पाचोड जुने, ता. पैठण), वामन शेखर हातागळे, किशोर विष्णू काळे (दोघे रा. वडीगोद्री, ता. अंबड, जि. जालना) अशी मृतांची नावे आहेत. अपघातातील जखमी पांडुरंग दत्तू बिबे (रा. वडीगोद्री, ता. अंबड, जि. जालना) यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत हातागळे हे पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयात पोलिस शिपाई म्हणून नेमणुकीस होते. स्विफ्ट कारची दुधाच्या टँकरला जोरदार धडक बसली. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी माहिती देताच भिंगार कॅम्प पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतांच्या नातेवाइकांना माहिती दिली. कारचालकाच्या चुकीमुळेच अपघात झाला असल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. जी. गुठ्ठे यांच्या फिर्यादीवरून मृत कारचालकाविरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी घटनास्थळी भेट दिली.