आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटार सुरू का केली म्हणून मद्यपीने मुलाला दिला शॉक, आईला मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी- शेतातील कृषी पंप का सुरू केला म्हणून एका मद्यपीने १४ वर्षाच्या शाळकरी मुलास त्याच्याच शेतात विजेचा शॉक दिला. तर त्याच्या आईस मारहाण केली. ही घटना  आष्टी तालुक्यातील पांढरी येथे बुधवारी घडली. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
 
तालुक्यातील पांढरी येथील शाळकरी मुलगा अशोक बापू शेळके (१४   )हा ४ आॅगस्ट २०१७  रोजी आपल्या शेतात  वीज पंप सुरू करण्यासाठी गेला होता. या वेळी वीज पंप का सुरु केला, अशी  विचारणा गावातीलच मद्यपी किशोर परमेश्वर शेळके  (रा. पांढरी ) याने मुलाला विचारत  शेतातील वीज मोटारीच्या स्टार्टरचे वायर काढून  दारूच्या नशेत बालकाला शॉक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून  अशोकची आई जया शेळके  घटनास्थळी धावून आली. मुलाला  किशोरच्या तावडीतून सोडवण्याचा तिने प्रयत्न केला असता तिलाही  मारहाण केली. या प्रकरणी जया शेळके यांच्या  तक्रारीवरून किशोर शेळके याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.  पोलिस उपनिरीक्षक गणेश गोडसे तपास करत आहेत. 

पांढरीला पोलिस उपअधीक्षकांची भेट  
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी पांढरी येथे पोलिस उपअधीक्षक डॉ. अभिजीत पाटील यांनी भेट दिली असता ग्रामस्थांनी आराेपी किशोर शेळके हा गावात विनाकारण लोकांना मारहाण करून  दहशत पसरतो, असे सांगीतले.
बातम्या आणखी आहेत...