आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडवणी तालुक्यात शेतकर्‍याची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडवणी- कर्जबाजारीपणा व दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने वडवणी तालुक्यातील तिगावमध्ये बुधवारी रात्री दहा वाजता तरुण शेतकऱ्याने घराजवळील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विकास दिगंबर बनसोडे (३०) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. विकास बनसोडे या शेतकऱ्यास १० एकर कोरडवाहू शेती आहे. यंदा शेतात त्याने बाजरी, सोयाबीन, तूर या पिकांची लागवड केली होती. पाऊस येत नसल्याने तो चिंतेत सापडला. कुटुंबाचा उदरनिर्वाह व शेतीचा खर्च भागवण्यासाठी वडवणी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे १ लाख पन्नास हजार रुपये, तर सेवा सहकारी सोसायटीचे ४० हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यातच ऊसतोड मुकादमाचेही पैसेे त्याच्याकडे हाेते.

सेलू तालुक्यात आत्महत्या
परभणी| सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथील शेतकऱ्याने नापिकी व बँकेचे कर्ज या विवंचनेत विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. मधुकर गणपतराव जाधव (४५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. चिकलठाणा येथील शेतकरी मधुकर जाधव यांनी त्यांच्या शेतात कापूस, सोयाबीन व मूग या पिकांची पेरणी केली होती. मात्र, पाणी नसल्याने पिके करपण्याच्या
मार्गावर होती.