आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांना लग्नासाठी कर्ज मिळेना, शेतकर्‍याच्या लेकीची आत्महत्या, लिहिली मार्मिक चिठ्ठी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- लग्न करण्यासाठी वडिलांना कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. लातूर तालुक्यातील भिसे वाघोली येथे शुक्रवारी सकाळी आठ वाजता घडली. याप्रकरणी मुरूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शीतल व्यंकट वायाळ (२१) असे मृत तरुणीचे नाव आहे. तिचे दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून तिच्या सोयरिकीसाठी अनेक पाहुणे येत होते, परंतु तिच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती.

गेल्या चार वर्षांपासून शेतात काहीच उत्पादन निघत नसल्याने हुंडा म्हणून देण्यासाठी तिच्या वडिलांकडे पैसे नव्हते. त्यामुळे केवळ पैशासाठी लग्न होत नव्हते. वराकडील मंडळी पसंत करूनही पैशाअभावी मंगलगाठ बांधली जात नसल्याने शीतलने शेतातील विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले. शीतलने अत्यंत मार्मिक शब्दांत चिट्ठी लिहून आत्महत्या केली.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... शितलने अत्यंत मार्मिक शब्दांत लिहिलेली सुसाईड नोट...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...