आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेंडावंदनासाठी आलेल्या मुलीचा शाळेतच चक्‍कर येऊन मृत्यू, नांदेडमधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - दापका राजा (ता.मुखेड) येथे झेंडावंदनासाठी गेलेल्या काजल बालाजी जाधव (१३) या मुलीचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

दापका राजा येथील श्री संत नामदेव महाराज माध्यमिक विद्यालयातील सातव्या इयत्तेत शिकणारी काजल जाधव झेंडावंदनासाठी १५ ऑगस्ट रोजी सकाळी शाळेत गेली होती. पावसामुळे मैदानात चिखल झाल्यामुळे झेंडावंदनाचा कार्यक्रम शाळेच्या छतावर ठेवण्यात आला होता. काजल छतावर जाण्यासाठी पायऱ्या चढत असताना चक्कर येऊन पायऱ्यांवरून खाली पडली.
 
त्यात ती गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने शिक्षकांनी जांब (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले होते. तेथे डॉक्टरांनी तपासून तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
दरम्यान, शवविच्छेदन जांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातच करण्यात आले. सायंकाळी दापका तांडा येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...