आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारातून गर्भधाराणा, घरच्यांनी जमवले लग्न; कुठल्या तोंडाने लग्न करावे म्हणून युवतीची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई- वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यांपूर्वी तिघांनी बलात्कार केला. यातून अत्याचारातील मुलीला गर्भधारणा झाली. कुटुंबातील लोकांनी लग्न जमवले. कुठल्या तोंडाने लग्न करावे या चिंतेतून तरुणीने राहत्या घरातच आडूला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथे ही घटना उघडकीस आली असून अत्याचारातून तरुणीला गर्भधारणा झाली होती हे पोलिस तपासात समोर आले आहे. दोघांना अटक केली आहे.  

तालुक्यातील गिरवली येथील एक मजूर पत्नीसह तीन मुलींना  बरोबर घेऊन अंबाजोगाई-आडस रस्त्यावरील वीटभट्टीवर राहात होते.  वीटभट्टीवर कुटुंबातील सर्वजण काम करत होते. याच कुटुंबातील एका  अल्पवयीन मुलीवर दत्ता अनुरथ रोडे, धनंजय रोडे (रा.कन्हेरवाडी ता.परळी) यांनी जिवे मारण्याची धमकी देत पाच महिने अत्याचार केला होता. तिसरा आरोपी दत्तात्रय नरसे (रा.अंबाजोगाई ) याने अल्पवयीन मुलीशी जवळीक करून त्या दोघांनी  केेलेल्या अत्याचाराची वाच्यता मी बाहेर करीन अशी धमी देत त्याने तरुणीवर  अत्याचार केला होता.
बातम्या आणखी आहेत...