आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजीपाल्याची आवक वाढल्याने घसरण कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर :लातूरच्या बाजारात महिनाभरापासून भाजीपाल्याच्या दरात सुरू असलेली घसरण अद्यापही कायम असून पुढील दीड महिना मंदी राहण्याची शक्यता भाजीपाला व्यापारी आडत सोसिएशनचे सचिव श्रीकांत ठोंबरे यांनी वर्तवली आहे.
यंदा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीसाठे झाले आहेत. त्यामुळे शेतकरी भाज्यांच्या लागवडीकडे वळल्याने उत्पादनात वाढ होऊन आवक वाढली आहे. परिणामी दर कमालीचे घसरले आहेत. त्यातच पुणे, सोलापूर, बार्शी, उस्मानाबाद परिसरातूनही येथील बाजारात मालाची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने दिवसाला जवळपास ३५ टन माल विक्रीला येत आहे. तुलनेत ग्राहकही कमीच आहेत. त्यामुळे भाव पडले आहेत.
भेंडी, दोडका, गवार आणि शेवगा वगळता उर्वरित सर्व भाज्यांना भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना लावणी ते काढणी आणि बाजारापर्यंतचा खर्चही निघणे अवघड झाले आहे. काही भाज्यांत तर शेतकऱ्यांची पदरमोड हाेऊ लागली आहे. कमी वेळेत आणि कमी खर्चात भाजीपाला उत्पादन घेता येत असल्याने शेतकरी त्याकडे वळले असले तरी आणखी दीड महिना मंदी राहणार असल्याने त्यांची चिंता वाढली आहे.
भाज्यांचे ठोक भाव
कोबी- ६ ते ७, वांगी- ८ ते १०, कारले- १२ ते १५, टोमॅटो-३ ते ४, शेपू- ८ ते १०, कोथिंबीर- ९ ते १०, काकडी-१० ते १५, मिरची-९ ते १०, सिमला मिरची-५ ते ६, भेंडी-३० ते ३५, दोडका- २२ ते २५, गवार- ३५ ते ४०, शेवगा- ५५ ते ६० रुपये प्रतिकिलो.
बातम्या आणखी आहेत...