आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमरेला गावठी कट्टा लावून फिरणारा तरुण अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी- गावठी कट्टा कंबरेला लावून फिरणाऱ्या तरुणाला  तालुक्यातील धानोरा येथे अंभोरा पोलिसांनी अटक केली. गुरुवारी आष्टी   न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. अभिजित शिंदे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.  
 
सालेवडगाव येथील अभिजित शिंदेसह अन्य  तीन तरुण धानोरा गावाजवळ येत  होते. याच वेळी पुंडी फाट्यावर समोरून  दोन दुचाकीस्वार येत होते. या वेळी अभिजित शिंदे  स्वत:जवळील  गावठी पिस्तूल काढून   एका दुसऱ्या दुचाकीस्वारास धमकावत होता. हा प्रकार एका पोलिस  मित्राने पाहून   अंभोरा पोलिसांना माहिती दिली.  पोलिसांनी शिंदेला धानोरा गावातच  पकडले. दरम्यान, यापूर्वी  शिंदे याला दुचाकी चोरी प्रकरणी अटक करण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...