आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘शेतकर्‍यांना सरकार वार्‍यावर सोडणार नाही’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - पाणी व चाराटंचाई निवारणास प्रशासनाने प्राधान्य देण्याचे आदेश देताना गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना शासन वार्‍यावर सोडणार नसल्याचे आश्वासन पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी सिल्लोड येथे आयोजित आढावा बैठकीत दिले.

पाऊस लांबल्याने तालुक्यातील गावागावांतील पाणी व चारा टंचाईचा आढावा घेण्यासाठी शनिवारी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी अब्दुल सत्तार बोलत होते. उपविभागीय अधिकारी सी. एस. कोकणी, तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी मनोज चौधर यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत गावनिहाय पाणी टंचाईचा आढावा घेताना पूर्ण, अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची माहिती घेऊन अपूर्ण योजना तातडीने पूर्ण करण्याचे व पूर्ण परंतु बंद असलेल्या योजना कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले. तर पाणीपुरवठा योजनांमध्ये त्रुटी असल्याने जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता रत्नाकर डोंगरे यांच्या कार्यशैलीवर मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. याबरोबरच मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले. तालुक्यात रब्बी हंगामात गारपीट झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. शेतकर्‍यांना शासन वार्‍यावर सोडणार नसून त्यांना मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. परंतु शासनाने मदत जाहीर केल्यानंतर शेतकर्‍यांपर्यंत मदत पोहोचवण्यास कृ षी विभाग अपयशी ठरल्याचा ठपका अब्दुल सत्तार यांनी ठेवला.

टंचाई आढावा बैठकीस उपनगराध्यक्ष किरण पवार, पंचायत समितीच्या सभापती रेखा जगताप, तालुका कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गणेश दौड उपस्थित होते.