आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबाजोगाईत चोरट्यांनी ६ दुकानांना लावली आग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - मोंढा भागातील राठी कन्फेशनर्स या दुकानाला चोरट्यांनी मंगळवारी पहाटे आग लावून पलायन केले. ही आग पसरत जाऊन सहा दुकाने खाक झाली. यात ५६ लाख
रुपयांचे नुकसान झाले.

अंबाजोगाईत गेल्या महिन्यापासून दरोडे, चोऱ्या वाढल्या आहेत. सोमवारी रात्री मोंढा भागातील व्यापारी नेहमीप्रमाणे दुकाने बंद करून घरी गेले. मंगळवारी पहाटे अडीच वाजता आदित्य ट्रेडिंग कंपनी, व्यंकटेश कृषी सेवा केंद्र, निर्मळे किराणा स्टोअर्स, औताडे किराणा आणि राठी कन्फेशनरी अँड जनरल स्टोअर्स या दुकानांचे शटर तोडून चोरट्यांनी रोख रक्कम पळवली. त्यानंतर राठी कन्फेशनरी दुकानाला आग लावली. आगीने रौद्र रूप धारण केले. शेजारील िवनोद मुंदडा यांच्या मुंदडा ट्रेडर्सच्या दुकानाने तसेच नायलॉन दोऱ्या, ताडपत्र्या आदी प्लास्टिकवजा वस्तूंच्या गोदामाने पेट घेतला. यापाठोपाठ सारडा अॅग्रो एजन्सीच्या खते, बी-िबयाणे, बालाजी टीन मर्चंट या दुकानातील प्लास्टिक पत्रे व लोखंडी पत्रे आगीत पेटले. राठी कन्फेशनरीतील चॉकलेट व िबस्किट तसेच जनरल स्टोअर्सचे सामान, ए-वन ट्रेडर्स दुकानातील पत्रा, पाइप, फायबरच्या वस्तू, िकरण भन्साळी यांच्या भुसार मालाच्या दुकानातील धान्य, िरकामा बारदाना भस्मसात झाला. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांची माणुसकी
पोलिसांनी आगीदरम्यान खते आिण बी-िबयाण्यांची पोती खांद्यावर उचलून आगीतून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पोलिस िनरीक्षक श्रीराम पौळ यांनी स्वत: भुसार मालाचे साहित्य आगीतून बाहेर काढले.