आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गर्भपात केल्याचे लपवले, डाॅक्टरवर खटला चालणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - बलात्कारामुळे दिवस गेलेल्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी केज ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. अशोक थोरात यांच्यावर खटला चालणार आहे. अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने हे आदेश दिले असून, डाॅ. थोरात यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना दिले आहेत. दरम्यान, डॉ. थोरात यांच्याविरुद्ध बेकायदेशीर गर्भपात व स्त्री भ्रूणहत्या केल्याच्या अन्य प्रकरणात केज कोर्टात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. तालुक्यातील पाथ्रा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी विद्यालयातील कर्मचारी दत्तात्रय गरड याने १ जुलै २०१२ रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. नंतर ती मुलगी गरोदर राहिली होती.

याप्रकरणी मुलीने युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली होती. डॉ. प्रतिभा थोरात यांनी सोनोग्राफी केली असता ती १४ आठवड्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर मुलगी गर्भपातासाठी केज ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक थोरात यांच्याकडे गेली होती. डॉ. थोरात यांनी पोलिसांना त्याची माहितीच दिली नाही. ५ सप्टेंबर २०१२ रोजी केजच्या ग्रामीण रुग्णालयात तिचा गर्भपात केला. गर्भपातापूर्वी मुलीच्या पालकांचे लेखी संमतीपत्र घेतले नाही. नात्यात नसलेल्या दुसर्‍या समाजाच्या राऊत नावाच्या महिलेस मुलीची मावशी दाखवले. दोन स्त्रीरोग तज्ज्ञांचा लेखी अभिप्राय घेतला नाही. या प्रकरणात तपास करणार्‍या अधिकार्‍यांनी अर्भक व आरोपीची डीएनए टेस्ट केली असती तर आरोपीला शिक्षा होऊन पीडित मुलीस न्याय मिळाला असता. त्यामुळे अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम आर. तेलगावकर यांनी डाॅ. अशोक थोरात यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...