आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • About Pritam Munde, The Girl Who Beat Modi\'s Record

PHOTOS : या आहेत महाराष्ट्राच्या ग्लॅमरस खासदार, मोडला मोदींचा विक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रीतम खाडे मुंडे - Divya Marathi
प्रीतम खाडे मुंडे
बीड- भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात आदराने घेतले जाते. सामान्‍य शेतक-याचा मुलगा ते केंद्रीय मंत्री हा त्‍यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. 12 डिसेंबरला त्‍यांचा जन्‍म दिन आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे, त्‍यांच्‍या रिक्‍त झालेल्‍या जागेवर निवडून आलेल्‍या प्रीतम मुंडे यांच्‍या जीवनपटाविषयी. गोपीनाथ यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांची कनिष्ठ कन्या डॉ.प्रीतम खाडे-मुंडे यांनी राजकारणात पदार्पण केले. एवढेच नाही तर मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीड लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसचे अशोक एस. पाटील यांना तब्‍बल 6 लाख 96 हजार 321 मतांच्‍या फरकाने मात दिली. लोकसभा निवडणुकीच्‍या इतिहासात भारतातील हा सर्वात मोठा विजय आहे. त्‍यामुळे नवा विक्रम प्रस्‍थापित झाला आहे.
मोदींचाही विक्रम मोडला
प्रीतम यांनी लोकसभा पोट निवडणुकीत 6 लाख 96 हजार 321 मतांच्‍या फरकाने विजय मिळवला. हा लोकसभा निवडणुकीत प्रस्‍थापित झाला एक मोठा विक्रम आहे. प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही रेकॉर्ड मोडीत काढला आहे. प्रीतम मुंडे यांनी लढवलेली लोकसभेची ही पहिलीच निवडणूक होती.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने दिला नाही उमेदवार... गौरव खाडेंशी झाला विवाह... शिक्षणाने आहेत डॉक्‍टर..