आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मोदींची भीती दाखवून मुस्लिम मते लाटण्याचा काँग्रेसचा डाव'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - नरेंद्र मोदींची भीती दाखवून लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मते लाटण्याचा डाव काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी शनिवारी येथे केला. येथे आयोजित सभेत ते बोलत होते. आझमी म्हणाले, काँग्रेसनेच मुस्लिमांचे सर्वाधिक नुकसान केले आहे. काँग्रेसच्या सरकारांतच निरपराध मुस्लिमांना आरोपी म्हणून डांबले जात आहे. समाजाने अशा ढोंगी पक्षापासून सावध राहावे.

ओवेसींना मुस्लिम स्वीकारणार नाहीत : पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लीग एक खासदाराच्या पुढे सरकू शकला नाही. तशीच अवस्था हैदराबादच्या एमआयएमची आहे. असुदोद्दीन अवौसी कितीही आक्रमक बोलले तर धर्मनिरपेक्ष मुसलमान त्यांना स्वीकारणार नाहीत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या लोकसभा निवडणुकीत आठ कोटी रुपये खर्च केल्याची कबुली स्वत:च दिली आहे. निवडणूक आयोगाने त्यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी आझमींनी केली.