आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात चौघांचा मृत्यू; बिहारच्या 2 व्यावसायिकांसह आजी-नातीचा मृतांत समावेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा- राष्ट्रीय महामार्गावरील (क्र.09) तालुक्यातील कराळी पाटीजवळ दोन ट्रकची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाला. चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आजी व एक वर्षाच्या नातीचा समावेश आहे. ही घटना मंगळवारी (दि.19) सकाळी 11.30 वाजता घडली.

कराळी पाटी जवळील वळणावर उमरगाकडून उसाची वाहतूक करण्यासाठी कर्नाटकातील हुमनाबादकडे जाणारा ट्रक (एमएम 13/आर/3567) व तलमोडकडून मुंबईकडे मिरची व आंबे भरून जाणाºया ट्रकचा (एमएच 25/यू/4953) अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही ट्रक बाजूच्या खड्ड्यात उलटल्या. उमरगा येथील महिला व बालिकेचा तर बिहार येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला. 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना उपजिल्हा रुग्णालय हलवले.


माहेरच्या नातेवाइकांना भेटून निघालेल्या आजी, नातीवर काळाने झडप घातली. अनसूया जाधव या आपली मुलगी अंबिका युवराज साळुंके व नात गुणगुण युवराज साळुंके यांच्यासमवेत तलमोड येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. परतीच्या वेळी त्या गावातूनच ट्रकमध्ये निघाल्या होत्या. याच गाडीमध्ये बिहाचे दोन युवक होते. तर दुसरी गाडी तलमोडकडून मुंबईकडे जात होती. दरम्यान, दोन्ही ट्रकचा अपघात झाला.
या घटनेमुळे तलमोड व उमरगा शहरावर शोककळा पसरली आहे. उमरगा पोलिसांत ट्रकचालक सुभाष गणपती रूपनुरे (रा. मुरूम, ता.उमरगा) व प्रशांत किरण मोरे (रा. तलमोड, ता. उमरगा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

मृतांची नावे - अनसूया पंडित जाधव, (50), त्यांची नात गुणगुण युवराज साळुंके (1, दोघी रा.उमरगा), संतोष सियानंद सहा (30, रा. सरय्या, ता. पताहे, जि. मोतीहारी, बिहार), मोहन रम्यकुमार ठाकूर (38, रा.सवाजपूर, ता. करसारी, जि. सिवर, बिहार)

जखमींची नावे - अंबिका युवराज साळुंके (24, रा. उमरगा), माधव एकनाथ मोरे, विद्याधर श्रीधर मोरे, प्रेमनाथ मनोहर बिराजदार, ट्रकचालक प्रशांत किरण मोरे (चौघे रा. तलमोड), अलीसाब बाबूमियाँ मुसारी, असलम अत्तार शेख, सुभाष गणपती रूपनुरे (ट्रकचालक), (तिघे रा. मुरूम), मुकेश रामजनम सहा, इंदर शंभुजा सहा, संतोष रामसेवक सहा, धर्मेंद्र अकबुल सहा (सर्व रा. सवाजपूर, ता. करसारी, जि. सिवर बिहार)

नांदेड जिल्ह्यात दोघांचा मृत्यू- शहराजवळील आसना नदीच्या पुलावर मंगळवारी दोन दुचाकीत समोरासमोर टक्कर होऊन एक जण ठार, तर तीन जण जखमी झाले. सिद्धार्थ नरवाडे (30, रा. तुप्पा, ता.नांदेड) असे मृताचे नाव आहे. मारुती चंपत एडके (22 रा.शेवडी बाजीराव, ता.लोहा), अनिल दत्ता सूर्यवंशी (30, रा. आमराबाद, ता.अर्धापूर) व जब्बार हैदर शेख (22 रा. शिराढोण, ता. कंधार) अशी जखमींची नावे आहेत.

दुसरा अपघात हातराळ (ता. मुखेड) येथे घडला. ऑटो उलटून कोंडाबाई इंगोले (45, रा. पुशावाडी, ता. देगलूर, ह.मु. हैदराबाद) यांचा मृत्यू झाला. त्या चार दिवसांपूर्वी भाऊ शिवाजी जाधव यांना भेटण्यासाठी बाºहाळी (ता. मुखेड) येथे आल्या होत्या.