आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्ताहाचा मंडप कोसळून आठ महिला भाविक जखमी, चऱ्हाटा येथील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- अखंड हरिनाम सप्ताहाचा मंडप कोसळून आठ महिला भाविक जखमी झाल्याची घटना बीड तालुक्यातील चऱ्हाटा येथे गुरुवारी दुपारी चारच्या दरम्यान घडली. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 

बीड तालुक्यातील चऱ्हाटा (ता. बीड) येथे नगद नारायण गडाचा वार्षिक हरिनाम सप्ताह सुरू आहे. शुक्रवारी सप्ताहाची समाप्ती आहे. विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. दुपारच्या सत्रात रामायण कथा असते. गुरुवारी रामायण कथा सुरू असताना अचानक आलेल्या वादळामुळे सप्ताहाचा मंडप कोसळला. मोठ्या प्रमाणावर महिला भाविक रामायण कथा श्रवण करत असताना मंडप कोसळल्याने महिला भाविक जखमी झाल्या. 

अनेकांच्या डोक्याला मार लागला आहे. चंद्रभागा उबाळे, मुक्ताबाई डोळस, मिना उबाळे, अाशा उबाळे यांच्यासह अन्य चार ते पाच महिलांना तत्काळ ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वाॅर्ड क्र. मध्ये सर्वांवर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. 
बातम्या आणखी आहेत...