आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खड्डा चुकवताना अपघात, नांदेडमध्ये दोघांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू, तर तीन जण जखमी झाले. नांदेड-लातूर मार्गावर एसजीजीएस कॉलेजसमोर शनिवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली.

मातोश्री इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी सूरज राजकुमार गच्चे (19, रा. अशोकनगर), विश्वजित भगवानराव कसबे (21, रा. कामठा), आशिष गोवंदे (19, रा. तरोडा नाका) हे तिघे हीरो होंडा स्प्लेंडर दुचाकीने (एमएच 8701) शहराच्या दिशेने येत होते. त्याच वेळी सहयोग महाविद्यालयाचे विद्यार्थी जयदीप उत्तम भोंग (22, रा. मुंबई), राम दशरथ हांडे (20, रा. विष्णुनगर) हे दोघे सीबीझेड दुचाकीने (एमएच 26 झेड 1663) विरुद्ध दिशेने येत होते. एसजीजीएस कॉलेजसमोर असलेल्या खड्ड्यांना चुकवण्याच्या प्रयत्नात भरधाव दोन्ही दुचाकी एकमेकांवर धडकल्या. या अपघातात सूरज राजकुमार गच्चे व जयदीप उत्तम भोंग यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अन्य तिघे जखमी झाले. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.