आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात एक ठार, दोन जण गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- वसमत-नांदेड रस्त्यावरील मालेगाव पाटीजवळ रविवारी दुपारी २ च्या सुमारास झालेल्या रस्ता अपघातात वाशीम येथील उपशिक्षण अधिकारी जगदेवराव नाईक हे जागीच ठार झाले असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. कारमधून (एम-३८-६००३) जगदेवराव नाईक हे हिंगोलीकडे येत होते.
दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या वाहनाला बगल देताना वसमत-नांदेड रस्त्यावरील मालेगाव पाटीवरील कार उलटली आणि नाईक जागीच ठार झाले. कारचालक पंडित पौळ आणि संदीप वडकुते हे गंभीर जखमी झाले. त्यांना नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील एलआयसी कार्यालय भागात राहणारे नाईक शहरातील सरजूदेवी विद्यालयात शिक्षकपदी कार्यरत होते. तीन वर्षांपासून ते उपशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होते. याबाबत वसमत पोलिसात नोंद करण्यात आली आहे.