आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हमदापूरनजीक कारच्या धडकेने पाथरीतील दोन युवक ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - पाथरी शहरातील दोन युवक मोटार सायकलवरून पाथरीकडे जात असताना मानवत तालुक्यातील हमदापूर पाटीजवळ सफारी कारने दिलेल्या जोरदार धडकेत दोघेही जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (दि.११) सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास घडली.
पाथरी येथील इंदिरा नगरातील मुस्तखीम कुरेशी (वय २०), इब्राहीम कुरेशी (वय ३५) हे दोघेही मोटरसायकल वरून (क्रमांक एम.एच.१२- एएस १३६८) हमदापूर येथे कामासाठी गेले होते. काम आटोपून ते परत पाथरीकडे जाण्यास निघाले होते. मानवत तालुक्यातील हमदापूर पाटीजवळ त्यांची गाडी आली असताना रामेटाकळीकडून परभणीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या सफारी कारने (क्रमांक एमएच २२ वाय ५३८७) ने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत दोघेही जागीच ठार झाले.
घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
परंडा येथील ५५ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
शहरातील एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.१०) सायंकाळी ६ च्या सुमारास उघडकीस आली. शहरातील कुऱ्हाड गल्लीत येथील अरुण जाधव (५५) यांनी रुई मार्गावरील बावची विद्यालयाच्या पाठीमागे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अरुण जाधव हे मजुरीचे काम करत होते. रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीवरून परंडा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे.
बातम्या आणखी आहेत...