आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू; विजेच्या धक्क्याने एक ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण/बिडकीन/सिल्लोड/ चिंचोली- जिल्ह्यात बुधवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा, तर कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू झाला. पहिल्या अपघातात भरधाव आयशर ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. औरंगाबाद-पैठण रस्त्यावर कौडगावजवळील वळणावर बुधवारी सायंकाळी हा अपघात झाला. सुधाकर भीमराव वाघचौरे (४५, धुपखेडा) असे मृताचे नाव आहे. बिडकीनहून येणाऱ्या आयशरने (एमएच १२ एचडी ७२५) पैठणकडे निघालेल्या सुधाकर वाघचौरे यांच्या दुचाकीला (एमएच २० बीडब्ल्यू ६०३) धडक दिली. या अपघाताबाबत माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश घोडके यांनी वाघचौरे यांना बिडकीन रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, अपघातानंतर संतप्त जमावाने आयशरवर दगडफेक केली. दरम्यान, तिसऱ्या घटनेत चिंचोली (लिं.) येथे रामप्रसाद मोतीराम मगारे केवट (५०) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली.
ट्रक झाडाला धडकला
दुसऱ्या अपघातात अजिंठ्याकडून येणाऱ्या भरधाव कंटेनरने (एमएच २० सीटी ९८७९) मंगरूळ फाट्याजवळ लिंबाच्या झाडाला धडक दिली. बुधवारी रात्री हा अपघात झाला. यात कंटेनरचालक ईश्वर गणेश सपकाळ (२६, आझादनगर, सिल्लोड) जागीच ठार झाला.