आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Accident News In Marathi, 5 Th Year Girl Accident Issue At Ambad, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाचवर्षीय मुलीस पोकलेनने चिरडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबड- नदीपात्रात पोकलेन अंगावरून गेल्याने पाचवर्षीय मुलीचा चिरडून जागीच मृत्यू झाला, तर तिच्या दोन वर्षांच्या भावाची प्रकृती गंभीर आहे. रविवारी पहाटे ही घटना अंबड तालुक्यातील साष्टी पिंपळगाव शिवारात घडली.
सीमा रामा चव्हाण (5, ब्रम्हनाथ तांडा, ता. मंठा) असे मृत मुलीचे नाव आहे. बाळू (2) हा गंभीर जखमी झाला. शनिवारी रामा चव्हाण कुटुंबीयांसह वाळू भरण्याच्या कामासाठी साष्टी पिंपळगाव नदीपात्रात आले. त्यांनी आपल्या मुलांना ट्रकच्या बाजूलाच झोपी घातले. रविवारी पहाटे पहिलाच टिप्पर भरून दिला. त्यानंतर पोकलेन सुरू होताच झोपी गेलेल्या मुलांच्या अंगावरून ते गेले. काही क्षणांतच सीमाचा मृत्यू झाला. गंभीर बाळूस तातडीने औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात हलवले आहे.
उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, पोलिस उपअधीक्षक विक्रांत देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन सकाळी 11.30 वाजता पंचनामा केला.