आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident News In Marathi, Different Accident Three People Killed, Divya Marath

वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री- पालफाटा, जामखेड फाटा व पैठण तालुक्यातील निलजगावजवळ झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.काळी-पिवळी जीप आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना पाल फाट्यावर मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजता घडली. या दुर्घटनेत दोघे जखमी झाले. त्यांना घाटीत दाखल करण्यात आले आहे. दत्ता साहेबराव साखळे (28) असे मृताचे नाव आहे. काळी-पिवळी जीप (एमएच 20 डब्ल्यू 2742) फुलंब्रीहून सिल्लोडकडे जात होती, तर सिल्लोड तालुक्यातील माणिकनगर (भवन) येथून दुचाकीने (एमएच 21 डब्ल्यू 4531) साहेबराव देवबा दिवटे (40, गणेशवाडी), अशोक गवळी (28, भवन) आणि दत्ता साहेबराव साखळे (28, भवन, ता. सिल्लोड) हे तिघे दुचाकीने फुलंब्रीकडे येत होते. सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास पाल फाट्याजवळ दुचाकी व काळी-पिवळी जीप यांची समोरासमोर जोराची धडक झाली. यात दुचाकीवरील तिघेही जखमी झाले. त्यांना घाटीत दाखल केले. मात्र, दुचाकीवरील दत्ता साहेबराव साखळे हा मरण पावला.
पादचारी तरुणास चिरडले
पाचोड 2 अज्ञात वाहनाखाली चिरडून 35 वर्षीय तरुणाचा चेंदामेंदा झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड फाटा (ता. अंबड) येथे सोमवारी रात्री 9 वाजता घडली. दत्तू कोंडिराम पवार (35, रा. कडेटाकळी, ता. शेवगाव, जि.अहमदनगर) असे अपघातात मरण पावलेल्या विवाहित तरुणाचे नाव आहे. तो कडेटाकळीहून आडूळ (ता. पैठण) जवळील निहाळवाडी येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी पायी जात होता. यादरम्यान त्याला अज्ञात वाहनाने चिरडले. अपघातानंतरही दत्तूच्या मृतदेहावरून अन्य वाहने गेल्याने मृतदेहाचा चेंदामेंदा झाला होता.
ट्रॅक्टरच्या धडकेने एक ठार
बिडकीन- पैठण तालुक्यातील निलजगावजवळ दुचाकी व ट्रॅक्टरच्या अपघातात एक ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. बिडकीन-निलजगाव रस्त्यावर दुचाकीवर ( एमएच 20 एव्ही 2606) पाडळी येथील जगन्नाथ काळे (45) व दत्ता हूड (42) हे दोघे पाडळीकडे चालले होते. या वेळी बिडकीनकडे येणार्‍या ट्रॅक्टरशी (एमएच 20 एएस 1409) त्याच्या दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील काळे व हूड गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावली डॉक्टरांनी जगन्नाथ काळे यास तपासून मृत घोषित केले.