लातूर - खड्डा चुकवताना बस झाडावर आदळून खड्डय़ात पडल्याने दोन जण ठार तर 17 जखमी झाले. मृतांत एका मोटारसायकलस्वाराचा समावेश आहे.
रविवारी दुपारी अडीच वाजता किल्लारीजवळ हा अपघात झाला. लातूरहून निलंग्याकडे जाणारी ही बस चलबुर्गा पाटीजवळ असलेल्या पुलावर मोटारसायकलस्वाराला चुकवण्याच्या प्रयत्नात झाडाच्या फांदीला धडकून दहा फूट खोल खड्डय़ात कोसळली. मोटारसायकलस्वार कार्तिक शेषेराव जाधव याच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला तर बसमधील प्रवासी दमयंती रावसाहेब फावडे (55, कवठा) यांचाही मृत्यू झाला.
अँम्ब्युलन्सची तत्परता
भारत विकास ग्रुप अंतर्गत महाराष्ट्र एमरजन्सी मेडिकल सर्व्हिसेसच्या अँम्ब्युलन्सची मदत मोलाची ठरली. किल्लारी, औसा, निलंगा येथील या अँम्ब्युलन्सच्या वैद्यकीय अधिकार्यांनी जखमींना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात आणले.
जखमींची नावे
खुदबोद्दीन बागवान, ताहिराबी बागवान, गौरीबी बागवान (सर्व राहणार नणंद ता. निलंगा), नागनाथ निडबोने पेठ, भारत शिरपुरे निलंगा, मालनबी बागवान, परवीन बागवान, जिशान बागवान, आयान बागवान, मोहोद्दिन बागवान, समशादबी बागवान, बसचालक ए. एम. सूर्यवंशी आदी.