आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Accident Nine Marriage Attendents Died, 12 Injured

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघातात नऊ व-हाडी ठार, १२ जण जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातात टेम्पोचा अक्षरश: चुराडा झाला. छाया : सारंग नेरलकर - Divya Marathi
अपघातात टेम्पोचा अक्षरश: चुराडा झाला. छाया : सारंग नेरलकर
नांदेड - ट्रक व वऱ्हाडाच्या टेम्पोची समोरासमोर धडक होऊन ९ जण ठार, तर १२ जण जखमी झाले. ही भीषण दुर्घटना शुक्रवारी मध्यरात्री नांदेड-लोहा मार्गावरील विद्यापीठाजवळ घडली. नवरदेवाचे वडील, बहीण, दोन मामा, मामीसह ९ जणांवर काळाने झडप घातली. मृतांत ४ महिलांसह बालिकेचाही समावेश आहे. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुदखेड तालुक्यातल्या बारड येथील बालाजी उत्तम शेहरे (२५)
या तरुणाच्या विवाहासाठी जाणा-यावऱ्हाडाच्या टेम्पोला हा अपघात झाला.

बारड येथे बांगड्या विक्रीचा व्यवसाय करणारे उत्तम वामनराव शहारे यांचा मुलगा बालाजी याचे लग्न कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातल्या मनोळी या गावात शनिवारी सकाळी १०.३० वाजता होते. त्यासाठी बारड येथून वऱ्हाडी मंडळी रात्री दोन टेम्पो ट्रॅव्हल्स गाड्यांनी निघाले. नवरदेव बालाजी अन्य वाहनाने पुढे निघून गेला. रात्री १२ वाजताच्या सुमाराला वऱ्हाडाला घेऊन जाणारा टेम्पो (एमएच २४ एफ ८५७४) विष्णुपुरी व विद्यापीठादरम्यान असणा-याउतारावरून भरधाव जात होता. विरुद्ध दिशेने कर्नाटकातून पेटकोल (कोळसा) घेऊन येणारा ट्रक (सीजी ०७ सीए ३५८२) त्याच वेळी एका वाहनाला ओव्हरटेक करत होता. भरधाव टेम्पो ट्रकवर एवढा जोरदार आदळला की, टेम्पोचे दोन तुकडे झाले. हा टेम्पो नगिनाघाट परिसरात राहणा-या
सतनामसिंघ सोढी यांच्या मालकीचा आहे. त्यावर पंजाबातील बलविंदरसिंघ ऊर्फ काल्या हा चालक होता. त्याचा अपघातात जागीच मृत्यू झाला.

अपघातात नवरदेवाचे वडील उत्तमराव वामनराव शहारे (५८, रा. बारड), बहीण विजयमाला अजितकुमार पोफळे (३५, रा. ब्राह्मणगाव), मामा शिवाजी हरिभाऊ भोकरे (५०), मधुकर हरिभाऊ भोकरे (५८) व मामी प्रमिला मधुकर भोकरे (४५), पार्वतीबाई बाबूराव गादिलवाड (४५, रा. पांढरवाडी), मथुराबाई मनोहर खरटे (५०, रा. पोतरा) व योगेश्वरी संजय लेनमोडे (५, रा. रिठद, ता. वाशीम) यांचा जागीच मृत्यू झाला. योगेश्वरीची आई जयश्री लेनमोडे (३८) अपघातात जखमी झाली. मृतांत मुदखेड, कळमनुरी, उमरखेड व वाशीम जिल्ह्याचे रहिवासी आहेत.

आमदार प्रताप पाटील चिखलीकरांची मदत
लोह्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर लोह्याहून नांदेडकडे येत होते. ते घटनास्थळापासून काही अंतरावर असतानाच हा अपघात झाला. त्यांनी तातडीने स्वत:ची गाडी जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी दिली. तसेच त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी वाहनातील जखमी आणि इतरांना बाहेर काढले.

चालक फरार
अपघातग्रस्त ट्रक रायपूरचा होता. तो कर्नाटकातून रायपूरकडे जात होता. चालक गोंदिया जिल्ह्याचा रहिवासी असून त्याचे नाव संदीप बलवंत माने आहे. अपघात झाल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. त्याच्यावर नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अपघाताची चौकशी पोलिस निरीक्षक श्रीधर पवार करत आहेत.