आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड-इस्लापूर मार्गावरील नाल्यात कार उलटली, औरंगाबादच्या बालिकेचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - नांदेड-इस्लापूर मार्गावर बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमाराला औरंगाबादहून इस्लापूरला जात असलेली कार पांगरीजवळ नाल्यात कोसळल्याने आठ महिन्यांच्या आरतीचा मृत्यू झाला. तिचे आई, वडील, भाऊ जखमी असून त्यांच्यावर इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

औरंगाबाद येथील बालाजी टोकलवाड कुटुंबासह नागपंचमीसाठी इस्लापूर येथे राहणाऱ्या साडभावाकडे कुटुंबासह कारने (एमएच २० बीवाय ५१६७) येत होते. पांगरी गावाजवळील नाल्यावर कार अाली असताना टोकलवाड यांचे कारवरील नियंत्रण सुटले. कार पुलावरून नाल्यात कोसळली. यात आरती या चिमुरडीचा मृत्यू झाला. अपघातात टोकलवाड (३२), त्यांची पत्नी सुवर्णमाला (३०) व मुलगा ओंकार (८) हे तीन जण जखमी झाले. पांगरी येथील ग्रामस्थांनी जखमींना रुग्णालयात हलवले. या प्रकरणी इस्लापूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली.