आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रॅव्हल्सचा अपघात; एक प्रवासी ठार, आठ जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडवणी- माजलगावहून पुण्याला निघालेल्या खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने  कुप्पा फाट्याजवळील पुलाजवळील वळणावर ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. या अपघातात एक प्रवासी ठार, तर अन्य आठ प्रवासी जखमी झाले. हा अपघात सोमवारी रात्री साडेदहा वाजता वडवणी- तेलगाव मार्गावर घडला असून  जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.  


सोमवार २० नोव्हेंबर २०१७ रोजी  माजलगावहून  पुण्याला  निघालेली देवकृपा ट्रॅव्हल्सला ( एम.एच. २३.डब्ल्यू ४१०५ ) रात्री   साडेदहा वाजता कुप्पा फाट्याजवळील एका पुलाजवळील वळणावर आली तेव्हा चालकाला ट्रॅव्हल्स  वळवता न आल्याने त्याचा ताबा सुटल्याने  रस्त्याच्या खालच्या बाजूला खड्ड्यात  असलेल्या कापसाच्या पळाट्याच्या ढिगावर ट्रॅव्हल्स आदळली. अपघातात खिडकीचा एक रॉड डोक्याला लागून गंभीर दुखापत झाल्याने ट्रॅव्हल्समधील प्रवासी  शेषराव कुलकर्णी (रा. पुणे ) हे  जागीच ठार झाले. अन्य प्रवासी  गणेश धर्मराज कदम (रा. निपाणी टाकळी, माजलगाव)माऊली रामकिशन शिंदे ,ज्ञानेश्वर कारभारी नरवटे,वैभव दगडू पांढरे  (तिघे रा. पायताळवाडी),अविनाश सुभाष डाकेे,दत्त लक्ष्मण जवदले ( रा. हिंगणवाडी)अजित बाबासाहेब सोनपसारे हे आठ प्रवासी जखमी झाले. जखमींना वडवणी पोलिसांनी रुग्णवाहिकेतून  जिल्हा रुग्णालयात हलविले. या अपघातानंतर देवकृपा ट्रॅव्हल्सचा चालक घटनास्थळावरून पसार झाला

बातम्या आणखी आहेत...