आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमधूनही पळाला होता सतीश; चकलांब्यात आठ गुन्हे दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई- सुनावणीनंतर हर्सूल कारागृहात परत जाताना बसमधून उडी मारून पळालेला अट्टल गुन्हेगार सतीश नज्जू चव्हाण हा यापूर्वीही बीडच्या कारागृहातून असाच पळाला होता. त्याच्यावर गेवराई, चकलांब्यात जबरी चोरीचे गुन्हे नोंद आहेत. दरम्यान, औरंगाबादमधून पळालेला सतीश चव्हाणाच्या मागावर आता बीड पोलिसांच्या नजरा लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेवराई तालुक्यातील उमापूर येथील रहिवासी असलेला सतीश नज्जू चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून महिलांच्या गळ्यातले दागिने लांबवणे, मारहाण करून लूटमार, सशस्त्र दरोडा, वाटमारी यांसारखे गुन्ह्यांमध्ये तो कुख्यात आहे. औरंगाबाद पोलिसांनी अटक केली होती. बुधवारी सुनावणीसाठी हर्सूल कारागृहातून न्यालयात नेल्यानंतर परत हर्सूल कारागृहात परतत असताना पोलिसांचा गुंगारा देऊन बसमधून उडी मारून सतीश पळाला. गुन्हे दाखल असल्याने बीड पोलिसांच्या नजराही आता सतीश नज्जू चव्हाणकडे रोखल्या आहेत.

दोनदा झाली शिक्षा
यापूर्वी दोन वेळा सतीश चव्हाण याने शिक्षा भोगली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्या उमापूर येथील घरी आई,वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. चकलांबा पोलिस ठाण्याने हद्दपारीची कारवाई केलेली आहे.

तेव्हा सापडला होता
२००८ मध्ये गेवराई, चकलांबा यासह शेजारील नगर जिल्ह्यातील शेवगाव, औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या ठिकाणीही त्याच्यावर गुन्हे नोंद दोनच दिवसांमध्ये त्याला जालन्यातील शहागडमधून अटक केली होती.

नाकेबंदी केली
सतीशवर हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली असून तो पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर चकलांबा हद्दीत नाकेबंदी करण्यात आली असून नागरिकांना तो आढळून आल्यास संपर्क साधावा.
-दिलीप तेजनकर, एपीआय ,चकलांबा