आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना: बलात्कार करणारा जेरबंद, मित्राकडे लपला होता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - प्रशांतीनगर भागातील १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी संतोष भिसे (२५) यास विशेष कृती दलाच्या पथकाने अटक केली. बुलडाण्यातील एका नातेवाइकाच्या घरातून गुरुवारी पहाटे त्याला पकडण्यात आले. दरम्यान, संतोष रेकॉर्डवरील गुन्हेगार असून एक वर्षापूर्वी त्याच्याकडून चोरीच्या २० दुचाकी पोलिसांनी जप्त केल्याचेही चौकशीत पुढे आले आहे.  
 
बुधवारी दुपारी ११.३० ते १२ वाजेदरम्यान घरी कुणी नसल्याची संधी साधत संतोषने पीडितेवर तिच्या राहत्या घरी बलात्कार केला होता. दरम्यान, पीडितेच्या आईला पाहून आरोपी मागच्या दरवाजाने पळून गेला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
जालना शहरात तणाव  
या घटनेनंतर आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी जमावाने शहरात दगडफेक केली. त्यामुळे शहरात तणावाची परिस्थिती होती. रात्री अकरा वाजेच्या सुमारास जमावाने वाहनांवर दगडफेक केली. यात काहींनी घोळक्याने येऊन  औरंगाबाद चौफुली ते भोकरदन नाका येथे वाहनांची तोडफोड करत काचादेखील फोडल्या. विशाल कॉर्नर येथे ट्रॅव्हल्स फोडली, तर शनि मंदिराजवळ काही वाहनांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ शहरात नाकेबंदी करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याने शहरात तणावपूर्ण शांतता होती.
 
संदर्भासाठी वाचा,
 
बातम्या आणखी आहेत...