आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षण कायद्यासाठी पत्रकारांचे घंटानाद आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवेदन देतांना पत्रकार संघ - Divya Marathi
निवेदन देतांना पत्रकार संघ
परभणी - पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा राज्य शासनाने करावा, या मागणीसाठी सोमवारी पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत घंटानाद करण्यात आला. आंदोलनात पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या प्रश्नावर संघर्ष करण्याचा इशारा दिला.
ज्येष्ठ पत्रकार हेमराज जैन, विजय जोशी, संतोष धारासूरकर, हेमंत कौसडीकर, दिलीप माने, आसाराम लोमटे, रमाकांत कुलकर्णी, अरविंद झरकर यांच्यासह पत्रकारांनी या वेळी मनोगत व्यक्त करत या प्रश्नावर एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार केला. आंदोलनात प्रा. सुरेश नाईकवाडे, प्रवीण देशपांडे, विनोद कापसीकर, पंकज क्षीरसागर, सुरेश कदम, अभिमन्यू कांबळे आदी सहभागी झाले होते.
दरम्यान, पत्रकारांवर हल्ले करणाऱ्या एकाही आरोपीला शिक्षा झालेली नसल्याने लोकशाहीचा हा चौथा स्तंभ जिवंत ठेवण्यासाठी पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा निर्माण करणे अत्यावश्यक झाले आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन योजना सुरू करावी, अशीही मागणी या वेळी करण्यात आली.

पत्रकार संरक्षण कायदा लागू करा
नांदेड | राज्यात तीन वर्षांत १८१ पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. यावर्षीच्या हल्ल्याची संख्या ४३ झाली आहे. ही चिंतेची बाब असून पत्रकारांना कायदेशीर संरक्षण द्यावे, अशी मागणी पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीने सोमवारी निवेदनाद्वारे केली. गेल्या १० वर्षांपासून डाॅक्टरांच्या धर्तीवर पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे; परंतु त्याकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...